जळगावमधून ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर झालेले करण पवार कोण आहेत..


24 प्राईम न्यूज 4 Apr 2024. पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर केली आहे. करण पवार यांना उमेदवारी देऊन शिवसेना उबाठा गटाने भाजपला (BJP) जोरदार धक्का दिला आहे. करण पवार हे भाजपने तिकीट कापलेल्या विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचे निकटवर्तीय आहेत. खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापल्यानंतर करण पवार हे देखील नाराज झाल्याने त्यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. करण पाटील यांना ठाकरे गटाने उमेदवारी दिल्याने जळगाव लोकसभा मतदार संघात ठाकरे गट विरुद्ध भाजपची चुरशीची लढत होणार आहे.यानिमित्त जाणून घेऊयात करण पवार यांची राजकीय कारकीर्द…
*वीस वर्ष आमदार असलेले आजोबा भास्कर राजाराम पाटील यांचे नातू
*काका डॉ. सतीश भास्कर पाटील माजी मंत्री आहेत
*2009 ला राष्ट्रवादी कडून नगर सेवक म्हणून निवडून आले
*2014 मध्ये भाजपमध्ये प्रवेश करत लोकनियुक्त नगराध्यक्ष झाले
*सध्या पारोळा येथे विद्यमान नगराध्यक्ष आहेत
*भाजप खासदार उन्मेष पाटील यांचे निकटवर्तिय मानले जातात
*उन्मेष पाटील आणि करण पवार हे दोघे जवळचे मित्र मानले जातात.
भाजपसाठी मोठा धक्का
विद्यमान खासदार उन्मेष पाटील आणि पारोळा येथील नगराध्यक्ष करण पवार या दोघांनी आज उद्धव ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला आहे. भाजपा सोडून उद्धव ठाकरे गटात प्रवेश केल्यास भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण देशभरात अन्य पक्षातून भाजपमध्ये अनेक बडे नेते प्रवेश करत असताना भाजप सोडून या दोन्ही नेत्यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केल्याने
राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे. करण पवार हे लोकसभा मतदार संघातील लढतीचे गणित बदलवतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
