सर्वोच्च न्यायालयाने टोचले अजित पवार गटाचे कान. -आमच्या आदेशाचा चुकीचा अर्थ? -सर्व जाहिरातींचा तपशील द्या


24 प्राईम न्यूज 4 Apr 2024. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीवर आक्षेप घेत शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या सुनावणीत आम्ही दिलेल्या आदेशानंतर अजित पवार गटाने किती जाहिराती दिल्या याचा तपशील सर्वोच्च न्यायालयाने मागितला. सोबतच आमच्या आदेशाचा जाणीवपूर्वक चुकीचा अर्थ लावण्याचा अधिकार कुणालाही नाही. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाचे कान टोचले.आमच्या आदेशाचा चुकीचा अर्थ? सर्व जाहिरातींचा तपशील द्याकेंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर १९ मार्च रोजी सुनावणी करतानासर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडील तुतारी हे निवडणूक चिन्ह आणि अजित पवार गटाकडील घड्याळ हे चिन्ह कायम ठेवले होते, परंतु निवडणुकीदरम्यान पक्षाची जाहिरात करताना राष्ट्रवादीकाँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे ठळकशब्दांत नमूद करण्याचे आदेशन्यायालयाने अजित पवार गटाला दिलेहोते. त्याचप्रमाणे मराठी, हिंदी आणिइंग्रजी वृत्तपत्रांत यासंबंधीची माहितीदेण्याची सूचनाही करण्यात आलीहोती, परंतु अजित पवार गटाकडूनसर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन होत नसल्याचा आरोप करीत शरद पवार गटाने पुन्हा न्यायालयात दाद मागितली आहे.
