ग्रुप ग्रामपंचायत पिंपळे खुर्द यांच्याकडून तहान भागविण्यासाठी आरो फिल्टर थंड पाण्याची सुविधा

0

अमळनेर/प्रतिनिधी

पिंपळे । ग्रुप ग्रामपंचायत चिमणपुरी पिंपळे खुर्द यांच्यातर्फे रखरखत्या उन्हात गावातील ग्रामस्थांसाठी व वाटसरूसाठी थंड पाण्याची सुविधा बस स्टॉप वरती परिसरातील श्री गुरुदेव दत्त मंदिर लागून केली आहे. या आरो फिल्टर चे उद्घाटन पाणपोईचे उद्घाटन परम पूज्य भरत पुरी महाराज तंटामुक्त अध्यक्ष निंबा चौधरी जयवंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी याप्रसंगी ग्रुप ग्रामपंचायत मध्ये ठराव करण्यात आला की ज्या लोकांची घरपट्टी व पाणीपट्टी निल असेल त्या लोकांना पाच रुपयात 15 लिटर पाणी देण्यात येईल व ज्या लोकांकडे थकबाकी असेल त्या लोकांना दहा रुपयात 15 लिटर पाणी देण्यात येईल लोकनवृत्त सरपंच वर्षा युवराज पाटील व उपसरपंच शोभा गोकुळ पाटील ग्रामपंचायत सदस्य संतोष चौधरी अरुण पाटील जयश्री पाटील मीना पाटील लोटन भिल सर्व सदस्य उपस्थित असताना ठराव करण्यात आला व ग्रामसेवक किरण लंकेश ग्रामपंचायत शिपाई ज्ञानेश्वर पाटील उपस्थित होते सर्व ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून हा निर्णय घेण्यात आला यावेळेस सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील गोकुळ पाटील निंबा चौधरी भगवान पाटील सुदाम पाटील आबा पाटील राकेश चौधरी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!