ट्रकने कट मारल्याने दुचाकीस्वार अरमान शाह(पहेलवान) यांचा मृत्यू.


अमळनेर : प्रतिनीधी. धुळ्याहून अमळनेरकडे दुचाकीवरून येत असताना सायंकाळी सहाच्या सुमारास ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वार अरमान शाह कमाल शहा वय 65 याचा मृत्यू झाला, तर दुचाकीचालक जखमी झाला. प्राप्त माहितीनुसार, शाहआलम नगर येथील रहिवासी अरमान शाह कमाल शाह हे धुळ्याहून जवळच्या नातेवाईकाला भेटून अमळनेर या गावी जात असताना जानेवे गावाजवळ सायंकाळी सहाच्या सुमारास लोखंडने भरलेल्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने गंभीर जखमांमुळे अरमान शहा याचा जागीच मृत्यू झाला.त्याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणला असता तेथे त्याच्या कुटुंबीयांची व गावातील लोकांची गर्दी झाली होती ट्रक चालक फरार झाला आहे या घटनेने कसाली व शहाआलम भागात शोककळा पसरली आहे.
