गद्दारांना १० तास थांबूनही तिकीट नाही- आदित्य ठाकरे

24 प्राईम न्यूज 5 Apr 2024

शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांनी अनेकांना खासदार बनवले. एका व्यक्तीला ५ वेळा खासदार बनवले, पण आता १० तास थांबूनही त्यांना उमेदवारी मिळाली नाही, असा टोला ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी भावना गवळींना उद्देशून लगावला. तिकिटे कापलेले अनेक जण आहेत. एक जरी उमेदवार पडला तर राजीनामा देईन, असा शब्द त्यांनी दिला होता. त्यांनाही ते तिकीट देऊ शकत नाहीत. त्यामुळे विधानसभेला आपले काय होईल याचा ४० गद्दारांनी विचार करावा, असेही आदित्य ठाकरे गुरूवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.
