एकनाथ खडसे दिल्लीत दाखल.. – खडसेंच्या भाजप ‘घरवापसी’ची चर्चा..

0

24 प्राईम न्यूज 2 Apr 2024. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे अचानक दिल्लीला रवाना झाल्याने ते भाजपमध्ये परतणार असल्याची जोरदार चर्चा राज्यात सुरू झाली आहे. अडीच वर्षांपूर्वी भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीत गेलेल्या खडसेंची उणीव भाजपला या निवडणुकीत चांगलीच जाणवत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्या तातडीने दिल्लीला जाण्याचा संदर्भ त्यांच्या संभाव्य पक्षबदलाशी लावला जात आहे.

मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने नाराज असलेल्या एकनाथ खडसेंनी काही काळ राजकीय विजनवासात घालवल्यानंतर खडसे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात दाखल झाले. मात्र, ते तिथे रमले नाहीत. त्यामुळे खडसेंच्या भाजप ‘घरवापसी’ची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.नाथाभाऊ यांनी पुन्हा भाजपमध्ये यावे, असे सूतोवाच आणि इच्छा खुद्द त्यांच्या स्नुषा आणि भाजप खासदार रक्षा खडसे यांनीही काही दिवसांपूर्वी बोलून दाखविली होती.

दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनीही एकनाथ खडसे हे भाजपमध्ये येण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे जाहीररीत्या सांगितले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!