आठ दिवसात पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास नगरपरिषदेवर हंडामोर्चा. -मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना निवेदन

0

अमळनेर/प्रतिनिधी

येत्या आठ दिवसात पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास नगरपरिषदेवर हंडामोर्चा काढण्यात येईल मा.नगरसेविका कमलबाई पितांबर पाटील तसेच रवि पाटील यांचे कार्यतत्पर मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना निवेदन

प्रभागासह अमळनेर शहराचा पाणी पुरवठा गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून विस्कळीत झाला असून येत्या काळात मराठी नवीन वर्ष गुढीपाडवा, मुस्लिम बांधवांचा रमजान महिना तसेच लग्न सराई सुरू असून प्रत्येक नागरिकांकडे पाहुणे आले असतात दुसरीकडे कडक उन्हाळा सुरू असून अश्यातच पाणी पुरवठा विभाग कधी आठ दिवसात तर कधी दहा दिवसात पाणी पुरवठा करते त्यात ही वेळेचे नियोजन नाही कधी सकाळी कधी दुपारी तर कधी रात्री तेही कमी दाबाने पाणी पुरवठा करतात अधिकारी, कर्मचारी तसेच व्हालमन यांच्यात ताळमेळ नसून दुसरीकडे नागरिक पाण्याच्या टाकीवर फोन करतात ते उचलले जात नाही उचलले तर कर्मचारी उर्मट पणे उत्तरे देतात तरी येत्या आठ दिवसात पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास प्रभागातील नागरिकांसह हंडा मोर्चा काढण्यात येईल असे निवेदन मुख्याधिकारी तथा मुख्यप्रशासक तुषार नेरकर तसेच पाणी पुरवठा अभियंता बैसाने साहेब यांना देण्यात आले असून कार्यतत्पर मुख्याधिकारी यांनी जातीने लक्ष देऊन आठ दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले आहे मुख्याधिकारी यांना निवेदन देतांना रवि पाटील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!