श्रीरामासारखे आदर्श पुत्र होणे परिवारासाठी गरजेचे—-मुक्तानंद बापु ———- -रणाईचे येथे श्रीराम कथेचे आयोजन —

अमळनेर/प्रतिनिधी
सतयुगात राजा दशरथाला श्रीरामासारखे आदर्श पुत्र जन्माला आले. त्यामुळेच ते एक मर्यादा पुरषोत्तम होऊ शकले. त्यांनी आपल्या जीवनात सत्याला व वास्तवाला महत्व दिले. म्हणून ते आदर्श राजा होऊ शकले. त्याप्रमाणेच सध्यस्थीतीत श्रीरामासारखे आदर्श पुत्राची गरज आहे.असे प्रतिपादन स्वामी मुक्तानंदजी महाराज यांनी रणाईचे ता. अमळनेर येथे बंजारा समाज बांधवानी आयोजित केलेल्या श्रीराम कथेत सांगितले.
यावेळी दररोज सात दिवस रात्री आठ ते अकरा वाजेपर्यन्त संगीत कथा श्रवणाचा आनंद रणाईचे सह परिसरातील गावातील आबाल वृद्ध यांनी लाभ घेतला. सात दिवसात श्रीराम जन्मोत्सव, सीता स्वयंवर, श्रीराम वनवास, सीता माता हरण, श्रीराम व रावण युद्ध आदी प्रसंग यावेळी हुबेहूब दाखवून भाविक भक्तांनी कथा श्रवणाचा आनंद घेतला.कलियुगात सर्वत्र स्वार्थाची दुनियादारी नजरेस पडते. मात्र प्रेम आणि सलोखा दिसत नाही असेही या कथेतून महाराजांनी सांगितले.
रणाईचे तांडा येथील सर्व बंजारा समाज बांधवानी या कथेचे आयोजन केलेले होते.दरम्यान यावेळी कथेला काँग्रेस व्ही. जे. एन. टी. विभाग जळगाव जिल्हा अध्यक्ष श्री. सुभाष जाधव यांनी भेट घेत महाराजांची भेट घेतली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सरपंच प्रकाश चव्हाण यांच्यासह सर्व समाज बांधवानी परिश्रम घेतले.