गावठी दारूची भट्टी उद्ध्वस्त; अमळनेर पोलिसांची धडक कारवाई. महिलासह तिघांवर गुन्हे दाखल.

अमळनेर /प्रतिनिधी. तालुका पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग यांनी संयुक्तरीत्या जानवे व म्हसले परिसरात गावठी दारूच्या हातभट्टीवर धाडी टाकत सुमारे सव्वादोन लाख रुपयांचे ३ हजार ८९० लिटर रसायन नष्ट करून दारू पाडण्याचे साहित्य जाळले, धरणगाव तालुक्यातील महिला व जानवे येथील व्यक्तींसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना जानवे येथे भिल्ल वस्तीत नाना बुधा पारधी (वय ६०) हा गावठी दारू विकताना आढळून आला. त्याच्याजवळील चार प्लास्टिक ड्रममध्ये असलेली आठ हजार रुपये स किमतीची ८० लिटर दारू नष्ट केली.
लागलीच त्यांना जानवे जंगलात सात तलावांच्या काठावर मोठ्या प्रमाणात दारूभट्ट्या सुरू असल्याचीमाहिती मिळताच त्यांनी त्या ठिकाणी धाड टाकली. तेथील आरोपी पळून गेला. मात्र तेथे १०० लिटर मापाचे ३० ड्रम असे ३ हजार लिटर कच्चे पक्केरसायन असा १ लाख ५६ हजार रुपयांचा माल जागेवर नष्ट करण्यात आला. तसेच दारू गाळण्याचे साहित्य जाळून टाकण्यात आले.