अमळनेर पोलिसांची नाका बंदी १लाख२०हजार रुपयांच्यां गांजा जप्त.

अमळनेर/प्रतिनिधी. अमळनेर पोलिसांनी जळोद येथे नाकाबंदी दरम्यान शिरपूरच्या दोघा तरुणांना १ लाख २० हजार रुपयांच्या गांजासह रंगेहाथ पकडले तर नगाव बुद्रुक येथे तीन ठिकाणी धाडी टाकून दारू, रसायन उद्ध्वस्त केले. जळोद गावाजवळ मंगळवारी दुपारी१२ वाजेच्या सुमारास पोलिस व एफएसटी पथकाने नाकाबंदी लावली होती दोनजणदुचाकीवर गांजा विक्रीसाठी अमळनेर येथे येत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांना एका दुचाकीवरून साजन पावरा (२१) व विशाल कुवरसिंग पावरा (२०, दोन्ही रोहिणी, पो. शिरकण पाडा) हे अमळनेरकडे येताना आढळले. त्यांची झडती घेतली असतात्यांच्याजवळ १ लाख २० हजार रुपये किमतीचा ७ किलो ९९० ग्रॅम गांजा आढळून आला.
नगाव बुद्रुक येथे मंगळवारी सकाळी नगाव ते चांदणी कुन्हे रस्त्यावर चिखली नदीकाठी सुकलाल वामन शिंदे, वामन शिंदे, राजेंद्र शिंदे यांच्या हातभट्टीवर धाड टाकली.
गांजा पकडण्यासाठी पोलिस निरीक्षक विकास देवरे, सपोनि अजित सावळे, हेकों किशोर पाटील, सिद्धांत शिसोदे, जितेंद्र निकुंभे, मिलिंद बोरसे, हर्षल पाटील, सुनील महाजन यांनी कारवाई केली. नगाव येथे पोनि विकास देवरे, अमोल पाटील, सुनील पाटील, विजय भोई, हितेश चिंचोरे, प्रमोद पाटील, राजेंद्र देशमाने, मधुकर पाटील यांच्या पथकाने धाड टाकली.