आधी आमदारकीचा राजीनामा द्या, मगच प्रचारात या ! -गिरीश महाजनांनी खडसेंना सुनावले.

24 प्राईम न्यूज 5 May 2024. एकनाथ खडसे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. खडसे यांनी आगोदर आमदारकीचा राजीनामा द्यावा. मग भाजपचे काम करावे. राजीनामा न देता भाजपचे काम करत असल्याने लोकांमध्ये गैरसमज होत आहे, अशा शब्दात गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना सुनावले आहे. एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये घरवापसी करण्याचा निर्णय घेतला. मात्र अजून त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झालेला नाही. त्यातच एकनाथ खडसे यांनी त्यांच्या सुनबाई रक्षा खडसे यांचा प्रचार रावेर लोकसभा मतदारसंघात सुरू केला आहे. यावरुन मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर निशाणा साधला आहे. ‘एकनाथ खडसे कधी म्हणतात मी राष्ट्रवादीचा तर कधी म्हणतात मी भाजपचा आहे. विधानसभेला मुलगी तुतारी
घेऊन उभी राहण्याच्या तयारीत आहे. खडसे यांची भूमिका संधीसाधूपणाची आहे. घरात सगळेच पक्ष ठेवायचे आहेत. यांनी आमदारकी आणि खासदारकीसाठी सगळ्यांचे काम करायचे. लोकांना असे राजकारण आवडत नाही, त्यामुळे त्यांनी एक भूमिका घ्यावी, अशी टीका महाजन यांनी माध्यमांशी बोलताना केली.