स्वतःच्या विहिरीवरून टॅकर द्वारे झाडाना पाणी देत दिले जीवदान.

0
आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

अमळनेर/प्रतिनिधी. तीव्र उष्णतेपासून शालेय परिसरातील झाडे वाचविण्याची धडपड
८० ते ९० झाडांना टँकरने पाणी पुरवठा
पिंपळे प्रतिनिधी :- येथील सु.अ. पाटील माध्यमिक विद्यालयाच्या आवारत लावण्यात आलेल्या ८० ते ९० झाडांना उन्हाच्या झळा बसून पाण्याअभावी ते वाळून नष्ट झाले असते. मात्र गावातील सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील यांनी असून याबाबत गावात त्यांचे कौतुक होत आहे.
पिंपळे ता. अमळनेर या गावाला यावर्षी पाणी टंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत असल्याने गावात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी शासनाने पाठविलेल्या टॅकर वर अवलंबून राहावे लागत आहे. तर जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.अश्या परीस्थित गावात असलेल्या कै. सुकलाल आनंदा पाटील विद्यालयात आमची शाळा आमचा अभियान या उपक्रमांतर्गत मुख्याध्यापक अशोक देसले यांनी शाळेच्या आवारात ८० ते ९० वृक्षांची लागवड करण्यात आली होती.मात्र मार्च महिन्यापासून गावाला मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावात लागत असल्यामुळे जगविण्यात आलेली झाडे पाण्याअभावी नष्ट होण्याची भीती निर्माण झाली होती.मात्र गावातील लोकनियुक्त सरपंच सौ वर्षा पाटील व सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील यांनी स्वतःच्या विहिरीवरून आठवड्यातून एक दिवस पाण्याचे टॅकर भरून शाळेत असणारी टाकी भरून देवून त्याद्वारे आठवड्यातून दोन दिवस झाडांना पाणी पुरवठा करण्यात येत असल्याने शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्य लाभत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!