१९ मे रोजी १८ वर्षांखालील मुलांच्या कुस्ती स्पर्धेचे आयोजन. -स्पर्धे मध्ये जळगाव,धुळे,नंदुरबार जिल्हयातील पहिलवान.

अमळनेर/प्रतिनिधी. शिवाजीनगर येथील जयहिंद व्यायामशाळेतर्फे १९ मे रोजी १८ वर्षांखालील मुलांच्या कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी लागली. शालेय विद्यार्थ्यांना कुस्तीची आवड निर्माण व्हावी, यासाठी माजी नगरसेवक प्रताप शिंपी यांनी १९ मे रोजीदुपारी ४ ते रात्री ८ च्या दरम्यान १८ वर्षांखालील कुस्ती स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धेमध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील पहिलवान सहभागी होणार आहेत. बाहेरून येणाऱ्या पहिलवानांची भोजनाची व्यवस्था व्यायामशाळेतर्फे करण्यात येणार आहे. मुलांना राज्यस्तरीय, विभागस्तरीय अशा विविध विजेत्यापहिलवानांचे वेगवेगळे डावपेच बघायला मिळणार आहेत१.
जास्तीतजास्त मुलांनी स्पर्धेत
सहभागी व्हावे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रताप शिंपी, पिंटू शिंपी,जीवन पवार, बबलू सोनवणे, अमोल चौधरी, पवन पैलवान यांच्याशी संपर्क
साधावा, असे आवाहन जयहिंद
व्यायामशाळेतर्फे करण्यात आले आहे.
