पवार कुटुंबीयांमधील नणंद-भावजय यांच्यातील लढतीमुळे साऱ्या राज्याचे लक्ष.

24 प्राईम न्यूज 7 May 2024. पवार कुटुंबीयांमधील नणंद-भावजय यांच्यातील लढतीमुळे साऱ्या राज्याचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले आहे. महाविकास आघाडीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार हे प्रमुख उमेदवार आहेत. वंचित बहुजन आघाडीने उमेदवार उभा न करता सुळे यांना पाठिंबा दिला आहे. पवार कुटुंबीयांमध्ये ही लढत होत असल्याने सर्वांचेच लक्ष लागले आहे. सुळे आणि पवार यांच्यात लढत असली, तरी या निवडणुकीतून ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या काका-पुतण्यातील वर्चस्वाची लढाई असणार आहे. या मतदारसंघात ३८ उमेदवार रिंगणात आहेत. या मतदारसंघात बारामतीसह खडकवासला, दौंड, इंदापूर, पुरंदर आणि भोर हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. मतदारांमध्ये शरद पवार यांच्याविषयी सहानुभूती आणि आदराची भावना असून, अजित पवार यांनी केलेल्या कामांमुळे त्यांनाही मोठ्या प्रमाणात मतदारांचा पाठिंबा आहे. खडकवासला मतदारसंघात पाच लाख २१ हजार मतदार आहेत. या मतदारांचा कौल हा निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.