विश्रांतीनंतर पवार ८ मेपासून प्रचारात

24 प्राईम न्यूज 7 May 2024.
प्रकृती अस्वास्थ्यामुळेडॉक्टरांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसशरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांचेसोमवारचे सर्व कार्यक्रम रद्द केले होते.त्यामुळे लोकसभेच्या ऐन रणधुमाळीत शरदपवार नेमके किती दिवस विश्रांती घेणार,असा प्रश्न सर्वांना पडला होता, पण २ दिवसांच्या विश्रांतीनंतर
पवार पुन्हा ८ मेपासून प्रचाराच्या रिंगणात उतरणार आहेत,अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावरून दिली आहे. २ दिवसांच्या विश्रांतीनंतर शरद पवार ८ मे रोजी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा दौऱ्यावर जाणार आहेत त्यांची श्रीगोंदा येथे तर त्याच दिवशी शिरूर येथेही सभा होणार आहे. यानंतर सायंकाळी ६.३० वाजता अहमदनगर येथे सभा
होणार आहे. ९ मे रोजी सातारा आणि बीड येथे सभा घेणार
आहेत. १० मे रोजी पुण्यातील वडगाव शेरी येथे प्रचार सभा होणार असल्याने ते पुन्हा प्रचार सभांचा धडाका लावतील.