मेहू येथे ४५ वर्षीय इसमाची गळफास.

पारोळा प्रतिनिधी /प्रकाश पाटील
पारोळा – तालुक्यातील मेहू येथे ४५ वर्षीय इसमाने लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केली. ज्ञानेश्वर रामचंद्र पाटील (४५) असे मृत इसमाचे नाव आहे.
दिनांक सात रोजी सकाळी सात च्या सुमारास त्यांनी आपल्या राहत्या घराच्या समोर असलेल्या लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केली.त्यांना लोकांनी खाली उतरवून पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.याबाबत राजीव पंडित पाटील यांचा खबरीवरून पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास कॉन्स्टेबल नाना पवार करीत आहे.दरम्यान ज्ञानेश्वर पाटील हे हातमजुरी करून आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाह करीत होते.त्यांच्या जाण्याने परिवारावर दुःखाच्या डोंगर कोसळला असुन परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.