निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे पथसंचलन.

पारोळा प्रतिनिधी/प्रकाश पाटील
पारोळा – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राहावी म्हणून पोलिस प्रशासनातर्फे शहरातील संवेदनशील व वर्दळीच्या भागातून सायंकाळी साडेसहा ते सव्वासात असा रूट मार्च काढण्यात आला.
रूट मार्च पोलीस ठाण्यापासून शिवतीर्थ,बाजारपेठ,नगरपालिका चौक,गावहोळी चौक,रथ चौक, राममंदिर चौक,कुरेशी मोहल्ला, झपाट भवानी चौक,आझाद चौक,मडक्या मारूती चौक,तलाव गल्ली ने काढण्यात आला.सदर रूट मार्च मध्ये पोलिस उपनिरीक्षक अमरसिग वसावे, पोलीस उपनिरीक्षक बी पी गिते व १० अंमलदार यांचेसह केरला पोलिसचे सहा.पो.निरिक्षक के. पी.गणेश,पोलीस उपनिरीक्षक एन.के.रतिश व ३५ अंमलदार आदी सहभागी होते.
स्ट्रीक्ट नाकाबंदी
अवैध,अनुचित गैरप्रकार लक्षात घेता पोलिस निरीक्षक सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी रात्री १० ते १२ या वेळेत पारोळा पोलीस स्टेशन समोर व धरणगांव माथा चौफुली येथे स्ट्रीक्ट नाकाबंदी करण्यात आली होती.