गौ मातेस जिवदान ; गौरक्षक समाधान धनगर यांची तत्परता.

पारोळा प्रतिनिधी/प्रकाश पाटील
पारोळा – गौ मातेवर मध्यरात्री वेळेवर तात्काळ उपचार झाल्याने तिला जिवदान मिळाले,गौरक्षक समाधान धनगर यांची तत्परता व प्राण्यांप्रती दाखविलेली भूतदया याचे कौतुक होत आहे.
शहरातील किसान कॉलेज समोर स्वामी समर्थ केंद्राजवळ रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास गावात मोकाट फिरणारी एक गाय आजारी व मुत्यक्षी झुंज देत होती, अचानक परीसरातील रहिवाशांचे गाईवर लक्ष गेले व तिची परिस्थितीबाबत सामाजिक कार्यकर्ते तथा बजरंग दलाचे पारोळा तालुका प्रमुख,गौ रक्षक समाधान धनगर यांना कळविले. गौरक्षक समाधान धनगर यांनी क्षणाचाही विलंब न करता आपले सहकारी राजु गढरी यांना घेऊन सदर ठिकाणी पोहचले.त्यांनी लगेच म्हसवे येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ उदय पाटील यांना फोनवर माहिती देऊन बोलवून तेथेच गौ मातेवर उपचार सुरू केला.गौ मातेस तात्काळ व वेळेवर उपचार मिळाल्याने तिचा मंद हालचाली वेगात सुरू झाल्या व ती उठून बसली.समाधान धनगर यांच्या तत्परतेने गौ मातेस जिवदान देण्यात यश आल्याने त्यांचे कौतुक होत आहे.यावेळी राजु गढरी,राज जगदाळे,राकेश धोबी व कॉलनी परिसरातील नागरिक उपस्थित होते.