शेतकऱ्याचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू.

पारोळा प्रतिनिधी/प्रकाश पाटील
पारोळा – शेतात बांधावर काम करताना चक्कर येऊन पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
तालुक्यातील करमाड बु. येथील शेतकरी अर्जुन भगवान पाटील (६८) हे दिनांक पाच रोजी सकाळी अकरा वाजता आपल्या करमाड खु.शिवारातील शेतात बांधावर काम करीत होते,यावेळी ते अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडले.त्यांना पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.याबाबत पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद होऊन तपास नाईक प्रदीप पाटील करीत आहे.दरम्यान,तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने हा उष्माघाताचा बळी ठरल्याचा अंदाज वर्तविण्यात आला.