करोडपती स्कूलच्या ४ विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड..

पारोळा प्रतिनिधी/प्रकाश पाटील
पारोळा – येथील सौ एम यु करोडपती इंग्लिश मीडियम स्कूल च्या ४ विद्यार्थ्यांची नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.ही स्पर्धा ८ ते १० में दरम्यान होणार आहे.त्यात संग्राम विजय मोरे,अनय हर्षल पाठक, विनेश महेश पाटील,नबील शेख रसूल कुरेशी यांची निवड झाली आहे.विद्यार्थ्यांना तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय विविध खेळात यश मिळत आहे. ह्या नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना महाराष्ट्र क्रिकेट संघात स्थान मिळविता येणार आहे. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष उमेश करोडपती, सचिव डॉ.सचिन बडगुजर,स्वाती बलखंडे,क्रीडा शिक्षक अकबर कुरेशी व सर्व स्टाफ आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.