सर्वाधिक मतदान आसाममध्ये, तर महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान.                                 -लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात ११ राज्ये

0

24 प्राईम न्यूज 8 May 2024.

आणि केंद्रशासित प्रदेशातील ९४ लोकसभा मतदारसंघात मंगळवारी ६१.८९ टक्के मतदान झाले. या टक्केवारीत आणखी वाढ होऊ शकते. आसामध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद झाली, तर महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान झाले आहे.

आसाममध्ये सर्वाधिक ७५.५३ टक्के नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तर महाराष्ट्रात सर्वात कमी म्हणजेच ५५.५४ टक्के मतदानाची नोंद झाली. तसेचबिहारमध्ये ५६.५५ टक्के, छत्तीसगडमध्ये ६७.६४ टक्के, दादरा नगर हवेलीमध्ये ६५.२३ टक्के आणि गोव्यात ७४.४७ टक्के मतदान झाले. याशिवाय गुजरातमध्ये ५६.९८ टक्के, कर्नाटकमध्ये ६८.८५ टक्के, मध्य प्रदेशमध्ये ६४.०२ टक्के, उत्तर प्रदेशात ५७.३४ टक्के, तसेच पश्चिम बंगालमध्ये ७३.९३ टक्के मतदान झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!