केजरीवाल २० मे पर्यंत कोठडीत..

24 प्राईम न्यूज 8 मे 2024
कथित मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्ली न्यायालयाने मंगळवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत २० मेपर्यंत वाढ केली आहे. राऊस अॅव्हेन्यू न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी ईडी खटल्यातील न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्याने मंगळवारी हा आदेश दिला. त्यामुळे केजरीवाल यांना आणखी १३ दिवस तिहार तुरुंगात राहावे लागणार आहे. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याही न्यायालयीन कोठडीत १५ मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दुसरीकडे केजरीवाल यांना अंतरिम जामीन देण्याच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. केजरीवाल यांना २१ मार्चच्या रात्री अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली होती.