अदानी-अंबानी कोणाचे दोस्त हे सर्वांनाच ठाऊक ३ टप्प्यांनंतर मोदी अस्वस्थ-शरद पवार

24 प्राईम न्यूज 10 May 2024
देशात लोकसभेच्या ३ टण्यांमध्ये कमी मतदान झाले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळेच निवडणुकीचे पहिले २ टप्पे संपताच नरेंद्र मोदी यांनी आपली भाषा बदलली. त्यांनी आपल्या जाहीर भाषणांतून मुस्लीम समाजाचा खुलेआम उल्लेख केला. पुढच्या टप्यात धर्मांध विचारांची मदत होऊ शकते असे त्यांना वाटत असावे. निवडणूक पुढे सरकताच मोदींचे स्थान संकात येत असल्याची भावना भाजपच्या नेत्यांमध्ये तयार झाली असावी असे माझे निरीक्षण असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. शरद पवार कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी सातारा राष्ट्रवादी काँग्रेस भवनात पत्रकारांशी संवाद साधला.
उद्योजक अदानी आणि अंबानी यांनी काँग्रेसला पैसे दिल्यामुळेच राहुल गांधी निवडणूक प्रचारात दोघांच्या नावांचा उल्लेख टाळत असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारच्या तेलंगणातील भाषणातून केला होता. यावर शरद पवार यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आतापर्यंत अदानी आणि अंबानी यांचे संबंध कोणाबरोबर जोडले आहेत, ते कोणाचे दोस्त आहेत, याबद्दल कोणाची चर्चा सुरू आहे याचा परिणाम पक्षाच्या मतदानावर होऊ नये यासाठी मोदी दुसऱ्या पक्षांची नावे घेऊन जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवत आहेत.