मुख्यमंत्री शिंदे ४ जूननंतर तुरुंगात जातील – राऊत

24 प्राईम न्यूज 10 मे 2024. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ४ जूननंतर तुरुंगात जातील, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी केला. त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, मी सांगतो या राज्याचे मुख्यमंत्री आहेत ना, शिंदे ते जूननंतर तुरुंगात जाईल किंवा तडीपार होईल. त्यांना मोदी-शहा पण वाचवू शकणार नाहीत. एकनाथ शिंदेंनी भ्रष्टाचारावर बोलावे हे मोठे आश्चर्य आहे. ऐन निवडणुकीच्या वेळी आमच्या नेत्यांना तडीपारीची नोटीस बजावली जात आहे. ४ जूननंतर राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनाही तडीपारीची किंवा मग तुरुंगात जायची नोटीस येईल. माझ्याकडून लिहून घ्या. त्यावेळी त्यांनी मोदी-शहा पण वाचवू शकणार नाहीत, असा दावा त्यांनी केला. पंतप्रधान मोदी यांनी विकासावर बोलायला हवे. विकसित भारत कसा तयार करता येईल, यावर बोलण्याची अपेक्षा आहे, मात्र ते केवळ टीका करण्यात व्यग्र आहेत. ते त्यांच्या मनाला वाटेल ते बोलत आहेत. त्यामुळेच त्यांची प्रकृती बरी नसल्याचे दिसत आहे. भाजपाच्या नेत्यांनी त्यांना प्रचारातून बाजूला करुन त्यांच्यावर उपचार करण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर टीका केली. ती टीका करत असताना त्यांनी एक आरोप केला. ते म्हणाले, उद्योगपती गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्या काळ्या पैशावर काँग्रेस ही लोकसभा निवडणूक लढवत आहे. या दोन उद्योगपतींनी राहुल गांधी यांना टेम्पो भरुन काळा पैसा पुरवला आहे. हे देशाच्या पंतप्रधानांचे वक्तव्य आहे. त्यामुळे त्याची दखल घेऊन ईडीने अदानी-अंबानींना अटक करावी. पंतप्रधान मोदी आता स्वतः च्याच अर्थदात्यांवर हल्ला करु लागले आहेत. अदानी आणि अंबानी हे भाजपचे अर्थदाते आहेत.त्यांच्यावरच आता मोदी आरोप करु लागले आहेत. याचा अर्थ ते या निवडणुकीत पराभूत झाले आहेत त्यांन पहिल्यांदाच एखाद्या ठिकाणी अंबानी आणि अदानी यांचे नाव घेतले आहे. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. गौतम अदानी आणि मुकेश अंबांनी यांचा काळा पैसा टेम्पो
भरून काँग्रेसकडे जात आहे. त्या पैशावर काँग्रेस निवडणूक लढतआहे. याचा अर्थ असा आहे की,मोदींना या भ्रष्टाचाराची, या गैरव्यवहाराची माहिती आहे. हे पीएमएलए अंतर्गत मनी लॉन्डरिंगचे प्रकरणआहे. त्यामुळे मोदी यांनी सक्तवसुली संचालनालयाला
सांगून या दोन उद्योगपतींना अटक केली पाहिजे.
त्यांच्यावरच कारवाई केली पाहिजे, अशीही मागणी
राऊतांनी केली आहे.