वंचित बहुजन आघाडी व शिवसेना ठाकरे गट यांची युती झाल्याने रावेर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये जल्लोष .

रावेर (प्रतिनिधी ) रावेर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आज दिनांक 25, 1,2023 रोजी दु.12 वाजता वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा व तालुका पदाधिकारी तसेच शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा व तालुका पदाधिकारी दोघे पदाधिकारी वंचित बहुजन आघाडी व शिवसेना ठाकरे गट यांची युती झाल्यामुळे रावेर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष योगीराज पाटील व शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख प्रल्हादजी महाजन तसेच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष रफिक बेग व जिल्हा संघटक शेख याकूब नसीर वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे या दोघे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दीप पूजा व धूप पूजा करून वंचित बहुजन

आघाडीच्या रावेर तालुकाध्यक्षांनी शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा उपाध्यक्ष योगीराज पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन व पेढे भरून सत्कार केला. यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा उपप्रमुख प्रल्हाद महाजन पेढे भरून यांचा सुद्धा सत्कार केला. शिवसेना शहर प्रमुख अशोक शिंदे यांचा सुद्धा पुष्पगुच्छ व पेढे भरून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिवसेनेचे भाऊलाल पैलवान, विनोद पाटील, संतोष महाजन, रवींद्र पवार, तसेच वंचित बहुजन आघाडीचे तालुका महासचिव कांतीलाल गाढे, रतन भालेराव, अर्जुन वाघ, सलीम शहा, राजेंद्र अवसरमल, दौलत अडांगळे, अब्बास भाई, नितीन अवसरमल सचिन हिवरे ,अण्णा वाघोदे ,किरण वाघ, भीमराव वाघ, तरुण सवर्णे, प्रदीप दामोदरे ,निलेश दामोदरे ,प्रमोद सवर्णे, संजय कोघे, भूषण सवर्णे, यांच्यासह दोघं पक्षांचे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.