अमळनेर तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी अँड दिपेन परमार तर उपाध्यक्षपदी अँड अमजद खान पठाण..

अमळनेर (प्रतिनिधि) अमळनेर वकील संघाची नवीन कार्यकारणी प्रकिर्या उत्साहात पार पडली आज तालुका वकील संघाच्या तालुकाध्यक्षपदी अँड दीपेन परमार चार मतांनी विजयी झाले आहेत तर उपाध्यक्ष व सचिव यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अँड के व्ही कुलकर्णी यांनी काम पाहिले.

उपाध्यक्षपदी अमजदखान पठाण तर सचिवपदी अँड राकेश बिऱ्हाडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा वकील संघातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी माजी अध्यक्ष अँड आर डी कच्छवा , माजी उपाध्यक्ष व्ही एन चौधरी , अँड ड राजेंद्र चौधरी , अँड शकील काझी , अँड आर व्ही निकम , अड बाविस्कर , अँड शशिकांत पाटील , अँड कुंदन साळुंखे , अँड राकेश पाटील हजर होते.