२५ जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस—

0

अमळनेर ( आबिद शेख )२०११ सालापासून दरवर्षी २५ जानेवारीला भारतात ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ साजरा केला जात आहे. २५ जानेवारी हा भारतीय निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस आहे. या दिवशी आयोजित विविध कार्यक्रमामधून विशेषत: नवीन पात्र मतदारांची नोंदणी वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. या दिवशी निवडणूक प्रक्रियेतील प्रभावी सहभागासाठी मतदारांमध्ये जागृती निर्माण केली जाते. भारतीय निवडणूक आयोग (ECI) ही भारतीय संविधानाद्वारे स्थापित केलेले एक स्वायत्त प्राधिकरण आहे आणि हे देशातील लोकसभा, राज्यसभा, राज्याच्या विधानसभा आणि राष्ट्रपती व उप-राष्ट्रपती यांची कार्यालये यामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रामुख्याने जबाबदार असते.

१९६२ साली मतदानाची प्रक्रि‍या कागदी मताद्वारे केले जात होते. वर्ष २००४ पासून मतदानासाठी इलेक्‍ट्रॉनि‍क व्होटर यंत्रांचा (EVM) वापर होत आहे. ECI ची अधिकृत स्थापना २५ जानेवारी १९५० रोजी करण्यात आली. तसेच राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून ही तारीख घोषीत केली गेली. याचे नवी दिल्लीत मुख्यालय आहे. सुनील अरोरा हे वर्तमान मुख्य निवडणूक आयुक्त आहे.

निवडणूक जगतातली व्यवस्थापनेसंबंधी सर्वात मोठी घटना म्हणजे, एप्रिल-मे २००९ मध्ये पार पाडलेल्या १५ व्या लोकसभेच्या निवडणुकीत ७१४ दशलक्ष मतदार, ८.३५ लक्ष मतदान केंद्र, १२ लक्ष EVM आणि ११ दशलक्ष मतदान कर्मचार्‍यांनी भाग घेतला होता. आयोगाला असे आढळून आले की, मतदारांच्या यादीतून १८ वर्षांच्या नव्या मतदारांची नावे वगळली गेलीत. या समस्येला पाहता तेव्हापासून देशभरात ८.५ लक्ष मतदान केंद्रांवर दरवर्षी १ जानेवारीला १८ वर्ष पूर्ण करणार्‍या सर्व मतदारांची ओळख केली जाते आणि त्यांचे नोंदणी केली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!