गर्ल्स हायस्कूल समोर भीषण असा अपघात. शहीद अब्दुल हमीद चौकात समोर गतिरोधक गरजेचे.

दोंडाईचा प्रतिनिधी रईस शेख
दोंडाईचा शहरातील गर्ल्स हायस्कूल समोर रात्री अकरा वाजेला एक अपघात घडला दुरद्यने कोणाला लागला नाही. राजपत रस्ता अत्यंत उत्कृष्ट झाल्याने रस्त्यावरील वाहतूक दुप्पटीने वाढली आहे. भरधाव वेगाने टू व्हीलर फोर व्हीलर एसटी बस मालवाहतूक गाड्या लक्झरी शेकडो गाड्या या रस्त्यावरून धावत असतात शहरातील हा मेन रस्ता असून या रस्त्यावर सारखी वर्दळ राहते शहरातील लहान मुली शाळेत येतात या रस्त्यावर येणे देखील टाळत असतात. शिवाय लहान मुली शाळेत येत असतात. त्यामुळे यात्रेचे स्वरूप राहते वेगाने जाणाऱ्या वाहनांना आळा घालण्यासाठी नगरपालिकेने गर्ल्स हायस्कूल जवळ गतिरोधक बसवणे गरजेचे झाले आहे. जेणेकरून छोटे-मोठे अपघात घडणार नाही व वाहनांची गती देखील मंदावेल व छोटे-मोठे अपघात टाळतील याच गर्ल्स हायस्कूल जवळ रात्री एक्सीडेंट ही झाला. तरी लोकांनी यांनी नगरपालिकेला तोंडी सूचना करून सर्वसामान्य जनतेची मागणीचा विचार करून गतिरोधक झाला तर बरे होईल.