निवडणूक संपताच देशात टोल दरवाढ.

24 प्राईम न्यूज 3 Jun 2024
लोकसभा निवडणूक संपताच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोल दराबाबत मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार रविवारी मध्यरात्रीपासून देशभरातील सर्वच टोलनाक्यांवर ३ ते ५ टक्के अधिक टोल आकारला जाणार आहे. एप्रिलमध्ये ही वाढ केली जाणार होती. परंतु, लोकसभा निवडणुकीमुळे ती पुढे ढकलली होती. प्रत्येक टोलमागे ३ ते ५ टक्क्यांची वाढ केली जाणार आहे. देशभरात जवळपास ११०० टोलनाके आहेत. या सर्व टोलनाक्यांवर ही वाढ केली जाणार आहे.