शांती,प्रसन्नता,प्रेम,यासाठी सूड, अहंकाराचा त्याग करा.- रत्नसुंदरसूरीश्वरजी म.सा.

अमळनेर/प्रतिनिधि. सुखी बनण्यापासून तुम्हांला कोणी थांबवू शकत नाही.गरीबपण आनंदी असू शकतो. तर्क, विचार, बुद्धी, अंहकार हे मुर्ख बनण्यातले अडथळे आहेत. शांती, प्रसन्नता व प्रेम या साठी सूड घेणे, अंहकार यांचा त्याग करा.असे अभ्यासपूर्ण विवेचन प्रवचनकार रत्नसुंदरसूरीश्वरजी म.सा. यांनी केले. ते अमळनेर येथील रत्नप्रवाह प्रवचन मालेत सहावे पुष्प गुंफताना बोलत होते. या प्रसंगी प्रवचन प्रभाविका श्री संवेगनिधीश्रीजी म.सा. उपस्थित होत्या.
‘प्रसन्ननेचा पंचामृत’ या विषयावर प्रवचन करतांना जीवनात प्रसन्न राहण्यासाठी पाच गोष्टी कराव्यात. 1) रेडी टू फुलीश 2) रेडी टू फ्लेक्सिबल 3) रेडी टू फरग्यू 4)ल रेडी टू फेथफुल5) रेडी टू फर्म
1) रेडी टू बी फुलीश- मुर्ख बनायला तयार रहा. उदा. रिक्षावाला रिक्षाचे भाडे ७० रूपये मागतो आहे. तुम्हाला माहित आहे.तो 20 रूपये जास्त सांगतो आहे. त्याला 20 रुपये द्या आपण मूर्ख आहोत, वेडे आहोत. असे समजा, त्याच्याशी वाद घालू नका. घासाघीस करु नका. पैशांसाठी संबंध बिघडवू नका. युद्ध जिंकण्यासाठी लहान लहान लढाईत पराभूत व्हा. 2)रेडी टू बि फ्लेक्सिबल- लवचिक रहा. लेट गो नेचर ठेवा. हे असेच पाहिजे, तसेच पाहिजे या साठी खूप आग्रही राहू नका. पाणी कोणत्याही भांड्यात ऍडजेस्ट होते. दगड ऍडजेस्ट होत नाही. जो क्षमा करू शकत नाही. त्याला क्षमा मागण्याचा अधिकार नाही. सतत तक्रार करण्याची मानसिकता चांगली नाही. परिवारात तरी लवचिक रहा. छोट्या छोट्या गोष्टी मुळे आपले संतुलन बिघडवू नका. फोटो चांगला आहे. एक्स रे खराब आहे म्हणजे मानसिकता चांगली नाही.
3)रेडी टू बी फरग्यू- जीवनातील अनेक अप्रिय गोष्टी विसरा, मला पैसे, वस्तू नको. आपल्या हदयात स्थान द्या ही भूमिका ठेवा. वाईट गोष्टी मनात स्टोअर करू नका, मनात गाठ नको. तुम्ही एक तर्फी प्रेम करा. त्याला एक तर्फी द्वेष करू द्या.
4) रेडी टू बी फेथफुल- जीवनात वफादार, प्रामाणिक राहण्याची मानसिकता ठेवा.नात्यांमध्ये प्रामाणिक राहणे अत्यंत गरजेचे आहे. व्यवहारात, बाजारात एक दुसऱ्याचा विश्वास तुटला की मंदी येते. आपण सतत गुरुदेवांशी, आई, वडित, पत्नी, मुलं यांच्याशी खोटं बोलतो.त्यामुळे आपली प्रतिमा भ्रष्ट होत चालली आहे. सर्वावर संताप करने बरोबर नाही.
5)रेडी टू बी फर्म – जीवनात काही चांगल्या गोष्टी वर पक्के रहा. मनोधैर्य, स्वभाव, संस्कार ढळू देऊ नका. पॉलिसी मॅटर मध्ये लेट गो नेचर चालेल.प्रिन्सिपल मॅटर मध्ये समझोता करू नका. श्रीतू वर्गात परिवर्तन झाले. तर प्रवचन सफल झाले असे मी समजेल असे भावपूर्ण उद्गार प्रवचनकार रत्नसुंदरसूरीश्वरजी म.सा. यांनी काढले. या प्रसंगी अमळनेर येथील मिडटाऊन हॉल मध्ये श्री- पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.