काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांनी केला बालेकिल्ला काबीज. -शोभा बच्छाव विजयी झाल्याने दोंडाईचात फटाक्यांची जल्लोष.

दोंडाईचा प्रतिनिधी रईस शेख
दोंडाईचा : धुळे लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे डॉ. सुभाष भामरे दोन वेळा खासदार राहून तिसऱ्यांदा खासदारकीसाठी भाजपाकडून उमेदवारी केली होती. यांचे प्रतिस्पर्धी म्हणून काँग्रेस कडून डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी देण्यात आली होती. आज निकालातून भाजपाला मोठा धक्का देवून काँग्रेसचे उमेदवार निवडून आल्याने ठिक ठिकाणी जल्लोष करण्यात आला.
दोंडाईचा येथे माजी मंत्री हेमंतराव देशमुख यांचे निवासस्थानी कार्यकर्त्यांनी गर्दी करत ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतीशबाजी करून हार के जितने वाले को बाजीगर कहते है अशी घोषणाबाजी करण्यात आली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अहिल्यादेवी होळकर पुतळा तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.
याप्रसंगी माजी मंत्री डॉ. हेमंतराव देशमुख माजी नगराध्यक्ष डॉ. रवींद्र देशमुख, अमित पाटील, रामभाऊ माणिक, दिनेश चोळके, राजू देशमुख, महेंद्र पाटील, बापू महाजन, अॅड. रवींद्र मोरे, अमर मराठे,मोना शेख, ईरफान सैय्यद, मोनु शेख, बिलाल बागवान, जितू चव्हाण, हुसेन भाई, भूपेंद्र धनगर, हरेश आव्हाड, अबिद शेख, जितेंद्र तिरमले मनोज लोहार, कालू नगराळे, रोहित गारुंगे, रवी पाटील, शिवा खंडाळे आदी उपस्थित होते.