साई इंग्लिश अकॅडमितसेच सामाजिक वनीकरणविभाग अमळनेर व वनक्षेत्र पारोळा,यांच्या संयुक्त विद्यमाने-जागतिक पर्यावरण दिनसोहळा साजरा.

अमळनेर/प्रतिनिधि. येथील साई इंग्लिश
अकॅडमि तसेच सामाजिक वनीकरण
विभाग अमळनेर व वनक्षेत्र पारोळा
यांच्या संयुक्त विद्यमाने-आज 5 जून
रोजी-जागतिक पर्यावरण दिन सोहळा
साजरा करण्यात आला.सोहळ्यास
बळवंत विठ्ठल पाटील-वनपरिक्षेत्र
अधिकारी सामाजिक वनीकरण,
अमळनेर यांच्या मार्गदर्शनाखली
महाराष्ट्र शासन वन विभाग टीमची
उपस्थिती लाभली. आय.टी.चव्हाण-
वनपाल , पी.जे.सोनवणे-वनपाल,
वैशाली साळी मॅडम-वनपाल
सामाजिक वनीकरण,अमळनेर
तसेच सीमा शिंदे मॅडम-वनरक्षक ,
सुप्रिया देवरे मॅडम वनरक्षक उपस्थित
होते. प्रमुख अतिथी आय.टी. चव्हाण
व सीमा शिंदे मॅडम, यांनी आपल्या
मनोगत भाषणात म्हटले –
पर्यावरणाच्या अनेक समस्या सध्या
जगभरात जाणवत आहेत.त्यासंदर्भात
जनमानसांत जागरूकता निर्माण
व्हावी,यासाठी दरवर्षी जागतिक
पर्यावरण दिन साजरा केला जातो.
कोरोना काळात ऑक्सिजनचे महत्व
आपल्याला समजले, वृक्ष हेच
ऑक्सिजन-प्राणवायूचे प्रमुख स्त्रोत
आहेत…म्हणूनच जास्तीत जास्त वृक्ष
आपण लावली पाहिजेत,ती जगवली
पाहिजे.ह्या प्रसंगी साई इंग्लिश
अकॅडमिच्या विद्यार्थ्यांना रोपे
वाटण्यात आली.विद्यार्थ्यांनीसुद्धा
मनोगतात सांगितले-आम्हाला
मिळालेली रोपे आम्ही आजच
आमच्या घराच्या बागेत,
परिसरात,शेतात व इतरत्र लावू.
रोपांची काळजी घेऊन,संगोपन करून
रोपांचा वाढदिवस साजरा करू.
सोहळ्याचे प्रास्ताविक साई इंग्लिश
अकॅडमि संचालक-भैय्यासाहेब मगर
यांनी केले.सूत्रसंचालन व आभार
कु.प्रियंका बारी यांनी केले.यावेळी
अकॅडमिचे विद्यार्थी व पालक उपस्थित
होते.