अजित पवार गटाचे आमदार ‘स्वगृही’ परतणार. आ रोहित पवार.

24 प्राईम न्यूज 6 Jun 2024
लोकसभा निवडणुकांत मिळालेल्या अपयशाने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधले १९ आमदार हे शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचा दावा आ. रोहित पवार यांनी केला आहे; मात्र कोणाला पक्षात प्रवेश द्यायचा किंवा नाही याचा अंतिम निर्णय हे शरद पवारच घेतील असेही ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत केवळ एकाच जागेवर अजितदादांना यश मिळाले आहे. प्रतिष्ठेच्या केलेल्या बारामती मतदारसंघातही त्यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या विधानसभा पार्श्वभूमीवर अजित पवार गटात चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार म्हणाले, अजित पवारांच्या पक्षातील १९ आमदार शरद पवारांच्या संपर्कात आहेत. अर्थात यापैकी कोणाला सोबत घ्यायचे किंवा नाही याचा अंतिम निर्णय शरद पवारच घेतील. पणआमचे पक्षप्रमुखांना एकच सांगणे – असेल की, जे आपल्या अडचणीच्या काळात सोबत राहिले – त्यांनाच प्राधान्य दिले पाहिजे. जे आपल्याला कोणत्याही कारणाने सोडून गेले असतील त्यांचा नंतर विचार केला पाहिजे.
–
दरम्यान, युगेंद्र पवार यांना आगामी विधानसभेत उमेदवारी देणार का या – प्रश्नावर कोणाला उमेदवारी दयायची किंवा नाही याचा निर्णय – शरद पवारच घेतात. येत्या काळात जास्त आमदार कसे निवडून आणता येतील यावर काम करेन, असेही रोहित पवार म्हणाले.
बारामतीतील सुप्रिया सुळे यांच्या विजयाबद्दल ते म्हणाले, बारामतीकरांनी आजपर्यंत शाहू, – फुले, आंबेडकरांच्या तसेच स्व. – यशवंतराव चव्हाण यांच्या – विचारांना पाठिंबा दिला आणि – भाजपाया विचाराला नाकारल आहे, तेच या निकालातून पुन्हा – एकदा स्पष्ट झाले आहे, असेही आम. पवार यांनी एका प्रश्नावर – उत्तर दिले.