एरंडोल येथे महिला डॉक्टरला ५ वर्षांची शिक्षा.. परवाना नसताना गर्भपात; महिलेचा मृत्यू.

एरंडोल (कुंदन सिंह ठाकुर) गर्भपाताचा परवाना नसतानाही गर्भपात केल्यानंतर झालेल्या अतिरक्तस्रावामुळे महिलेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी डॉ. सुरेखा शामलाल तोतला (४०, रा. मारवाडी गल्ली, एरंडोल) यांना बुधवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. सापटणेकर यांनी ५ वर्षांची सश्रम कारावासाची व एकत्रित ५२ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
यात डॉ. सुरेखा तोतला यांनी २२ जून २०१२ रोजी कुसूमबाई बाळासाहेब मराठे (३५, रा. टोळी, ता. एरंडोल) यांचा गर्भपात केला अतिरक्तस्रावामुळे महिलेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी तत्कालीन पोलिस निरीक्षक मोहन बनकर यांच्या फिर्यादीवरून २३ जून २०१२ रोजी एरंडोल पोलिस ठाण्यात तोतला यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३०४, २०१ सह एमटीपी अॅक्ट ५ (३) (४) नुसार गुन्हा दाखल झाला होता. बनकर यांनी गुन्ह्याचा तपास करून तोतला यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले.