दोन हजार पाचशे रुपये ची लाज स्वीकारताना ग्रामसेवकाला रंगेहाथ पकडले..

अमळनेर (प्रतिनिधि) गारखेडा व बाभळे ग्रुप ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक अनिल नारायण गायकवाड, (वय ५०) रा. चहार्डी ता.चोपडा याने गारखेडा येथील रहीवासी व्यक्ती कडून माहिती देण्यासाठी 3000 रुपये मागणी करून 2500 रुपये स्वीकारले असून त्यास रंगेहात पकडण्यात आले आहे.
तक्रारदार याने सदर ग्रामपंचायती मध्ये सन २०१५ ते २०२० या कालावधी दरम्यान ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या विविध योजनांच्या कामाचे झालेले लेखापरीक्षण बाबतची माहिती ही माहितीच्या अधिकाराचा अर्ज करून मागितलेली होती. सदरची माहिती ही वेळेत न मिळाल्याने तक्रारदार यांना सदर माहिती देण्याच्या मोबदल्यात पंचासमक्ष प्रथम ३,०००/रुपये व तडजोडीअंती २,५००/- रुपये लाचेची मागणी करुन सदर लाच मागणी केलेली रक्कम धरणगाव अमळनेर रोडवरील सिंधु ढाबा येथे पंचासमक्ष स्वतःस्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आला असून धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सापळा पर्यवेक्षण अधिकारी शशिकांत पाटील, (पोलिस उप-अधीक्षक ला.लु.प्र.वि. जळगांव), सापळा व तपास अधिकारी संजोग बच्छाव, पोलिस निरीक्षक, सहसापळा अधिकारी पोलीस निरीक्षक एन. एन. जाधव, पो. ना. बाळू मराठे, पो.ना. ईश्वर धनगर यांचेसह कारवाई मदत पथकातील स. फौ. दिनेशसिंग पाटील, स.फौ. सुरेश पाटील, पो.हे.कॉ. सुनिल पाटील, पो.हे.कॉ. रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो. ना. जनार्धन चौधरी, पो.ना. किशोर महाजन, पो.ना. सुनिल वानखेडे, पो. कॉ. राकेश दुसाने, पो. कॉ. प्रणेश ठाकुर, पो. कॉ. अमोल सुर्यवंशी यांनी ही कारवाई सफल केली त्यांना शर्मिष्ठा घारगे- वालावलकर (पोलीस अधीक्षक, ला. लु.प्र.वि, नाशिक), एन. एस. न्याहळदे, (अप्पर पोलीस अधीक्षक ला. लु.प्र.वि, नाशिक), नरेंद्र पवार ( वाचक पोलीस उप अधीक्षक, ला. लु.प्र.वि, नाशिक) यांचे मार्गदर्शन लाभले. “