गरीबांचे दुःख दूर करण्यासाठी चांगल्या हृदयाची गरज -रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा.

अमळनेर/प्रतिनिधि
लोकांना हवे ते लोकांना मिळाले. पाहिजे लोकांना काय हवे आहे. लोकांना चांगला डॉक्टर पाहिजे, औषधी पाहिजे,आरोग्य चांगले पाहिजे.
गरीबांचे दुःख दूर करण्यासाठी चांगल्या हृदयाची आवश्यकता आहे.
असे आग्रही प्रतिपादन रत्नसुंदरसूरिश्वरजी म.सा. यांनी केले,ते अमळनेर येथे रत्नप्रवाह प्रवचन मालेत ८ ने पुष्प गुंफताना “मला चांगले व्हायचे आहे” या विषयावर ते बोलत होते. या प्रसंगी प्रवचन प्रभाविका श्री संवेगनिधीजी म.सा.उपस्थित होत्या.
मला चांगले बनण्यासाठी गुरुदेवांनी पाच गोष्टी सूचविल्या आहेत.
१)गुड हार्ट२)गुड हँबिट३) गुड हेल्थ ४)गुड हेल्प ५)गुड हार्ड वर्क.
१)गुड हार्ट- संवेदनशील हृदय दुःखा ला पाहू शकत शकत नाही. मी दुःख पाहू शकत नाही. मला दुःख दूर करावयाचे आहे.
गुड हार्टअसणारे दुःख दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात. आपल्या कडील कामगार, नोकरांचे दुःख दूर करा. २)गुड हॅबीट-
शेअरींग करने ही चांगली सवय आहे, देण्याची सवय असली पाहिजे ,वेळ, शब्द, संपत्ती, शरीर यापैकी तुम्हांला जे देणे शक्य आहे ते द्या. तुमचा स्वभावच मदत करण्याचा असला पाहिजे. वर्षातून एक वेळा केले तर त्याला कृती म्हणतात. रोज करतात त्याला सवय म्हणतात.
३) गुड हेल्थ –
तुम्हांला संपत्ती हवी की आरोग्य हवे?
आपण आरोग्य खराब करून संपत्ती कमवितो. नंतरआरोग्यासाठी संपत्ती खर्च करावी लागते. गुरुदेव म्हणाले माझी तब्येत चांगली आहे. म्हणुन मी प्रवचन देत आहे. पॅकेजच्या नोकरी वाल्यामुळे घरातीत शांतता बिघडली आहे.सर्वांना चांगले आरोग्य हवे आहे.
४)गुड हेल्प- प्रत्येकाची मदत करण्याची मानसिकता असली पाहिजे. गरीबांच्या आरोग्याची, शिक्षणाची काळजी घेतली पाहिजे. एका लहान मुलीने तिच्या करियर साठी ठेवलेले पाच लाख रुपये कोरोनामध्ये गरीबांसाठी खर्च केले.
५)गुड हार्ड वर्क- अँडव्हान्स टेक्नोलॉजीने हार्ड वर्कला संपवून टाकले आहे. लिहणे, बोलणे हे हार्ड वर्क आहे. आरोग्य, संबंध, संस्कार या तीन गोष्टी हार्डवर्क मुळे साध्य होतील.लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. हार्ड वर्क करण्याची मानसिकता ठेवा.वरील पाच गोष्टी केल्यानंतर जीवनावर, मनावर, शरीरावर विपरीत परिणाम होणार नाही. व चांगले बनण्यापासून तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही.असा आशावाद प्रवचनकार रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा. यांनी आपल्या प्रवचनातून मांडला. याप्रसंगी अमळनेर येथील मिडटाऊन हॉल मध्ये, स्त्री-पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.