नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान मोदींचे ७२ जणांचे महाजम्बो मंत्रिमंडळ – ३१ कॅबिनेट, ५ स्वतंत्र कार्यभार, ३६ राज्यमंत्री.

0

24 प्राईम न्यूज 10 Jun 2024. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात रविवारी सायंकाळी ७.१५ वाजता मैं नरेंद्र दामोदरदास मोदी, ईश्वरसाक्ष शपथ लेता हूं… हे वाक्य उच्चारताच नवा अध्याय रचला गेला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदींना पंतप्रधानपद आणि गोपनीयतेची शपथ देताच पंतप्रधान मोदी हे सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधानपद भूषवणारे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यानंतरचे दुसरे पंतप्रधान ठरले आहेत. जवळपास ८ हजार विशेष पाहुण्यांच्या उपस्थितीत हा भव्यदिव्य शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी सुरक्षा यंत्रणांचा कडेकोट बंदोबस्त होता. नरेंद्र मोदी यांच्यासोबतच ३० जणांनी कॅबिनेट मंत्रिपदाची आणि ४१ जणांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यापैकी ५ जणांकडे स्वतंत्र कार्यभार सोपवण्यात आला आहे. तब्बल ७२ मंत्र्यांचे मोदींचे महाजम्बो मंत्रिमंडळ असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!