कोथळीच्या सरपंच ते आता केंद्रातील मंत्री अशी राजकीय वाटचाल.

0

24 प्राईम न्यूज 10 Jun2024. सासरे एकनाथ खडसे यांच्या बंडानंतर त्यांना साथ न देता आपले स्वतंत्र अस्तित्व कायम राखलेल्या रक्षा खडसे यांना त्याचे आता फळ मिळाले आहे. उत्तर महाराष्ट्र, महिला, ओबीसी हे सारे मुद्दे त्यांच्यासाठी उपयुक्त ठरले. कोथळीच्या सरपंच ते आता केंद्रातील मंत्री अशी त्यांची राजकीय वाटचाल राहिली आहे. जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात खडसे कुटुंबीयांचा दबदबा राहिला आहे. संगणकशास्त्रातील पदवीधर आणि मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजी या चार भाषांवर प्रभुत्व असलेल्या रक्षा खडसे या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा आहेत. रावेर मतदारसंघातून महायुतीतर्फे भाजपने रक्षा खडसे यांना सलग तिसऱ्यांदा संधी दिली.

रक्षा खडसे यांचा जन्म १३ मे १९८७ रोजी झाला. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचा विवाह एकनाथ खडसे यांचे पुत्र निखिल खडसे यांच्याशी झाला. २०११ मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मनीष जैन यांनी निखिल खडसे यांचा पराभव केला. विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर वर्षभरातच २०१३ मध्ये निखिल यांनी आत्महत्या केली. रक्षा यांच्यासाठी ही मानसिक आघात करणारी घटना होती. परंतु, यातून त्या सावरल्या. पतीची इच्छा पूर्ण करण्यासाठी राजकीय व सामाजिक कार्यात झोकून दिले. सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, २०१४ मध्ये रावेर मतदारसंघातून खासदार, असा त्यांचा राजकीय आलेख चढता राहिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!