माझी इच्छा शक्ती व आपली क्रिया शक्ती एकत्र आल्याने देश आंनदी होईल–रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा.

.
अमळनेर/प्रतिनिधी. आम्ही रिचनेसला हॅपनिस मानले अधिकाधिक पैसे कमविण्याची वाईट नशा निर्माण झाली आहे. गुरुदेव म्हणाले माझ्या जवळ काहीही नाही. तरी मी हॅपी आहे. माझी इच्छा शक्ती व आपली क्रिया शक्ती एकत्र आल्याने भारत देश आनंदी होईल. असे आवाहन प्रवचनकार रत्नसुंदरसूरीश्वरजी म.सा यांनी रत्नप्रवाह प्रवचनमालेत १२ वे पुष्प गुंफताना केले. रत्नसुंदर महाराज साहेबांनी लिहिलेला ४६६ व्या पुस्तकांचे प्रकाशन मा.अनिल भाईदास पाटील, मदत व पुर्नवसन मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते झाले. या प्रसंगी माजी नगराध्यक्षा सौ. जयश्री पाटील व प्रवचन प्रभाविका संवेगनिधीश्रीजी म.सा.उपस्थित होत्या.

अनलॉक हॅपिनेस यासाठी गुरुदेवांनी ५ गोष्टी सांगितल्या
१)लिमिट लेस वेल्थला ब्रेक लावा.२)लिमिट लेस वर्क ३)एम लेस विशेष (इच्छा) ४)लिमिट लेस वरी ५)लिमिट लेस वार.
१)लिमिट लेस वेल्थ ला ब्रेक लावा- सतत संपत्ती मिळविण्याची मानसिकता तुम्हांला आजाराकडे घेऊन जाते. जीवनात अमर्याद पैसा वाढल्यानतंर शांतता, प्रेम, प्रसन्नता, पवित्रता वाढत नाही.ज्यांच्या जवळ पैसे कमी आहेत त्यांचे दुःख दूर करता येईल. परंतु असलेले पैसे कमी वाटतात. त्यांचे दुःख कोणी दूर करू शकत नाही. २)लिमिट लेस वर्क-रात्रदिवस काम याला काम केंद्रित जीवन म्हणतात.काहींना गती हीच शक्ती वाटते तुम्ही कुठपर्यंत पळाल,फक्त तुम्हाला बिझनेस लाईफच आहे का? कुटुंबातील लोकांना कधी वेळ देणार ? वेळ, शरीर,शक्तीचीही काही मर्यादा असते. वर्क फ्रॉम होम मुळे तरुण अस्वस्थ आहे.तुमचा फोटो चांगला पण एक्स रे खराब.
३)एम लेस विशेष- म्हणजे ध्येय नसलेली इच्छा आवश्यकता ही रेषे सारखी असते. रेषा सुरु होते आणि संपते देखील परंतु इच्छा ही सर्कल (वर्तुळ)सारखी असते. संपत नाही सुरुवात व शेवट कळत नाही.
४)लिमिट लेस वरी- अमर्याद चिंता उद्या काय होईल? माझ्या परिवाराचे काय होईल. असा सतत तुमच्या मनात विचार असतो. अनेकांना घाई आणि चिंता हा रोग झाला आहे.अति चिंतेमुळे चितेजवळ जाण्याची वेळ येते.जीवनात खालील चार गोष्टीत समझोता करू नका१)पीस ऑफ माइंड २)हॅपीनेस हार्ट३)लव्ह विथ फॅमिली मेंबर४)लेट गो नेचर या चार गोष्टी खूप महत्वाच्या आहेत.
५)लिमिट लेस वॉर-पैसे असल्यामुळे कोणावरही भुंकाल का तुम्ही पाळीव कुत्रा आपल्या माणसांना सोडून देतो. पैशांसाठी कौटुंबिक संघर्ष टोकाचा सुरु आहे. माणसाच्या शरीरात राक्षस घुसला आहे.पैशांसाठी वडिलांनाही सोडत नाहीत.तुम्ही कोणाचे ऐकून थांबणार आहात का नाही?जीवन केव्हाही समाप्त होऊ शकते. स्मशानात लोकांनी तुमच्या बद्दल काय बोलावे असे वाटते? साधुच्या मनात करुणा नसती तर त्यांनी बोलणे बंद केले असते. तुम्ही जे मिळेल त्यात समाधान मानणार असाल. तर तुम्ही हॅपी आहात. असे अभ्यासपुर्ण व प्रेरणादायी निवेदन प्रवचनकार रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा. यांनी केले.अमळनेर येथील मिडटाउन हॉल प्रवचन ऐकण्यासाठी गच्च भरलेला असतो,श्रोतु वर्गात चांगले परिवर्तन होईल. अशी ताकद गुरुदेवांच्या प्रवचनात आहे.