शासनाने फिरवली दिव्यांगाकडे पाठ दिव्यांग बघत आहे पेन्शन ची वाट.

0

अमळनेर /प्रतिनिधी. लोकसभा निवडणुकीच्या धावपलीत शासनाने चक्क दिव्यांगाकडे पाठ फिरवली आहे. दिव्यांग व्यक्तीना मिळणारी संजय गांधी दिव्यांग पेन्शन योजनेचे मानधन गेली 2महिने झाले दिव्यांग व्यक्तीच्या खात्यावर जमा झालेले नाही. ज्या गरीब गरजू अनाथ उदारनिर्वाह पेन्शन वर होत आहे ते पेन्शन ची आतुरतेने वाट पहात आहे. काही महिन्या पूर्वी महाराष्ट्र शासनाच्यावतीने शासन दिव्यांगाच्या दारी हा उपक्रम राबवला पण महाराष्ट्र राज्यातील किती गरजू दिव्यांगाना या योजनेचा फायदा झाला हा प्रश्न आता दिव्यांगाकडून उपस्थित होत आहे.आमदार व खासदार याच्या पेन्शन मध्ये नेहमीच भरगोस वाढ होत आहे पण दिव्यांगाना महिना 1500रु मिळणारी पेन्शन वेळेवर मिळत नाही. इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील दिव्यांग व्यक्तींना मिळणाऱ्या पेन्शन मध्ये महाराष्ट्र राज्य सरकार ने वाढ करावी व ती वेळेवर मिळावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!