परिवाराला सामुग्री, सत्ता, पैशांपेक्षा तुमचे प्रेम हवे…रत्नसुंदरसूरीश्वरजी म.सा.

अमळनेर /प्रतिनिधी. प्रत्येकाच्या जीवनात एक व्यवस्था पाहिजे. शिस्त (अनुशासन) पाहिजे, तुमच्याकडे असलेल्या वेळेचे नियोजन पाहिजे. तुम्हाला जीवनात अग्रक्रम निश्चित करावे लागतील. तुमच्या परिवाराला सामुग्री, सत्ता, पैसा नको आहे. त्यांना तुमचा वेळ व प्रेम हवे आहे. असे अभ्यासपूर्ण मत अमळनेर येथील रत्नप्रवाह प्रवचन मालेत प्रवचनकार रत्नसुंदरसूरीश्वरजी म.सा. यांनी व्यक्त केले ते रत्नप्रवाह प्रवचनमालेत तेरावे पुष्प गुंफताना बोलत होते. प्रवचन प्रभाविका श्री संवेगनिधीश्रीजी म.सा उपस्थित होत्या.
“आम्ही कुठे अभी पडलो ” या विषयावर बोलतांना गुरुदेवांनी खालील सहा गोष्टी सांगितल्या.1)जीवनात एक व्यवस्था पाहिजे. 2) दुसऱ्या प्रती सहानभूती पाहिजे 3) डोळ्यात लाज पाहिजे.4) कामात उत्साह (स्पिरिट) पाहिजे5) चेहऱ्यावर हास्य पाहिजे 6) स्नेहाची भावना पाहिजे.
1)जीवनात एक व्यवस्था हवी – वेळ आणि व्यक्तीसाठी आपल्याकडे कशी व्यवस्था आहे. मी प्रवचन करतो व पुस्तक लिहितो- तुम्ही तुमचे जीवनात अग्रक्रम निश्चित करा. मुलांशी बोला, परिवाराला वेळ द्या. त्यांच्यावर प्रेम करा.
2)दुसऱ्या प्रति सहानुभूती बाळगा-
गरीबा सोबत चांगला व्यवहार करा.
तुमच्या घरातील कार्यक्रमाला ड्रायव्हर, नोकर, वॉचमनला बोलवा. तुम्हाला वस्तू दिसतात. सभोवतालची माणसं का दिसत नाही. रिक्षावाल्याला रिक्षाच्या भाड्या- बरोबर प्रेम ही द्या.
3)डोळ्यात लाज पाहिजे-डोळ्यातील लाज नष्ट झाली आहे. कोणी चांगले ऐकायला तयार नाही. मनोधैर्यावर कुटुंबात चर्चा होते का ? तुमच्या परिवारात चर्चेत कोणते विषय असतात.चुकीच्या वाईट कामाची आपल्याला लाज वाटली पाहिजे. निती, नियम, निषेध, निमंत्रण या गोष्टी असल्या पाहिजे. मजेत जीवन जगण्याची मानसिकता समाजात आहे.
4)कामात उत्साह (स्पिरिट) पाहिजे-स्पिरिट नाही, उत्साह नाही, तुम्ही तुमच्यासाठी काही व्यक्तिगत पातळीवर काही नियम तयार करा. सवय स्वभावात परिवर्तित झाली पाहिजे.चांगला गोष्टी करण्याचे स्पिरिट आपल्याला निर्माण करावे लागेल. बर्निंग डिझायर पाहिजे.
5)चेहऱ्यावर हास्य पाहिजे -चेहऱ्यावर हास्य हवे. छोट्या, छोट्या गोष्टीने तुमच्या चेहऱ्यावरील हास्य जाते. अपेक्षा जास्त व पुण्य कमी त्यामुळे चेहऱ्यावरील हास्य जाते. समाजात घटस्फोट होत आहे. हास्य नाही. मुलांना हास्याचे शिक्षण द्या.
6)स्नेहाची भावना पाहिजे – शहरात चांगल्या गोष्टी होत असतील. तर प्रशंसा करा. तुमच्या हृदयात प्रशंसा करण्याचा भाव हवा. दगडा सारखे मन झाले तुमचे, तुम्ही कुठे कमी पडता हे तपासा असा घरगुती सल्ला मिडटाऊनमध्ये झालेल्या प्रवचनात रत्नसुंदरसूरीश्वरजी म.सा. यांनी दिला. या प्रसंगी अमळनेर शहरातील शेकडो भाविक उपस्थित होते.