परिस्थिती तुमच्या हातात नाही,मनःस्थिती तुमच्या हातात….रत्नसुंदरसूरीश्वरजी म.सा.

अमळनेर /प्रतिनिधी
तुमच्या परवानगी शिवाय विचार येऊ शकत नाही. विचार करणे तुमच्या हातात आहे. मी अस्वस्थ होईल असा विचार मी करणार नाही. मुनीकडे काहीही नसताना
जीवन सुखी आहे. परिस्थिती तुमच्या हातात नाही. मनःस्थिती तुमच्या हातात आहे. असे महत्वपूर्ण मार्गदर्शन अमळनेर येथील रत्नप्रवाह प्रवचन मालेत प्रवचनकार रत्नसुंदरसूरीश्वरजी म.सा. यांनी केले. ते १४ वे पुष्प गुंफताना बोलत होते. या प्रसंगी प्रवचन प्रभाविका श्री संवेगनिधीश्रीजी म.सा. उपस्थित होत्या.
जीवन जगतांना “आम्हाला भरपूर शक्ती दे”या विषयावर बोलतांना गुरुदेवांनी ५ महत्वपूर्ण गोष्टी सांगितल्या 1) पॉवर ऑफ सिलेक्शन 2)पॉवर ऑफ रिजेक्शन 3) पॉवर ऑफ प्रोटेक्शन 4) पॉवर ऑफ करेक्शन 5) पॉवर ऑफ अपेक्शन
1)पॉवर ऑफ सिलेक्शन – मला चांगल्या गोष्टीची निवड करण्याची शक्ती मिळावी. घटना आपली शक्ती नाही. घटन आपली शक्ती आहे. दैनंदिन जीवनात चांगल्या वस्तूंची निवड करतो. आपण त्याप्रमाणे चांगले विचार ही निवडले पाहिजे. लोकांमध्ये परिवर्तन होईल यात शंका नाही. २) पॉवर ऑफ रिजेक्शन -ज्या गोष्टीमुळे मी अस्वस्थ होईल, माझी प्रसन्नता, प्रेम, शांतता नाहिसे होईल असे मी करणार नाही. नाही म्हणायला शिका. नकार दिला नाही. म्हणून अनेक घर तबा झाली. नाही म्हणण्याची शक्ती तुमच्याकडे असली पाहिजे.
3)पॉवर ऑफ प्रोटेक्शन – जीवनात संस्कार, सदाचार, शिल, संबंध, संपत्ती या सर्वांची सुरक्षा करावयाची आहे. तुम्ही सदाचाराचे नाही.तर लैंगिक शिक्षणाची चर्चा करतात. साधूंना तुम्ही सांभाळले, संस्कार सांभाळण्याची जबाबदारी साधूची आहे. आमचे सरस्वती मंदिर आहे. सेक्स मंदिर नाही. 4)पॉवर ऑफ करेक्शन- जीवनात होणाऱ्या चुका दुरुस्त करा.चूकांचे रिपिटेशन करू नका. तुमच्यातील कमकुवतपणा नाहिसा करा. खालील प्रकारचे दिवस साजरे करा .प्रेम पर्व, परोपकार पर्व, प्रसन्नता पर्व, पुण्य पर्व, प्रशंसा पर्व, प्रवृत्ती पर्व, संवादात, व्यवहारात, व्यवसायात चूका होतात.परंतु त्या दुरुस्त करा त्या रिपीट करू नका.
5) पॉवर ऑफ अपेक्शन – दुसऱ्या प्रति लगाव प्रेम असले पाहिजे.
जीवन यशस्वी असेल. तर मृत्यू मंगल होतो.तुमचा शेवटचा क्षण कसा राहील? परमेश्वराने मला शक्ती दिली पाहिजे.याची याचना मी करीत आहे. असे भावपूर्ण विवेचन मिडटाऊन येथे झाले. रत्नप्रवाह प्रवचन मालेत रत्नसुंदरसूरीश्वरजी म.सा. यांनी विविध किस्से व गोष्टीच्या माध्यमातून केले. या प्रसंगी अमळनेर शहरातील शेकडो भाविक उपस्थित होते.