ज्या मातीवर आई चालते,ती माती स्वर्गाची असते…रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा.

0


अमळनेर/प्रतिनिधी. तुमच्या जेवणाच्या ताटात ने पदार्थ असतात. ते ज्या शेतकऱ्यांनी निर्माण केले त्यांचे चांगले झाले पाहिजे.त्यासाठी काम करा.श्रद्धा,प्रेम,विश्वासावर जग चालते.ज्या मातीवर आई चालते.ती माती स्वर्गाची असते. असे भावपूर्ण उद्‌गार अमळनेर येथील रत्नप्रवाह प्रवचन मालेत सुप्रसिद्ध प्रवचन‌कार रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा. यांनी काढले. ते १५ वे पुष्प गुंफताना बोलत होते. या प्रसंगी प्रवचन प्रभाविका श्रीसंवेगनिधीश्रीजी म.सा. उपस्थित होत्या.

“सदा सुरक्षित रहा” या विषयावर बोलतांना त्यांनी ५ गोष्टीचा अंगीकार करायला सांगितले.१)सेफ डिसीजन२) सेफ डिस्टन ३)सेफ डिलिव्हरी४) सेफ डिपॉसीट५)सेफ ड्रायव्हिंग
१) सेफ डिसीजन – ज्यांचा तुमच्यावर विश्वास आहे. त्यांच्याशी चुकीचा व्यवहार करणार नाही.
तुमच्या मुलाचा तुमच्यावर विश्वास आहे का? स्वतःचे परीक्षण स्वतः करा.माझे शरीर खाण्यावर चालते, सरकारचे शरीर टॅक्स वर चालते.टॅक्स वाचवण्याचा प्रयत्न का करतात. भरोसा तूटला तर माणूस तुटून जाईल.
२) सेफ डिस्टन – सुरक्षित अंतर ठेवा. तुमचे सर्व मित्र विश्वासू हवेत. कोणाच्याही इतके जवळ जावू नका. की विश्वास तुटल्यावर तुम्ही कोणावरच विश्वास ठेवणार नाहीत. कुंडली नाही मंडली चेक करा. मुली तुझ्या संस्काराचा भरोसा आहे. लोकांच्या संस्काराचा भरोसा नाही.म्हणुन वडील मुलीची काळजी घेतात, शेअर बाजार हा तर जहर बाजार आहे.
३)सेफ डिलिवरी – तुमच्या अनुपस्थितित तुमची प्रशंसा करणारा परिवार आहे. परिवारातील किती माणसं तुमची प्रशंसा करतात.चांगल्या गोष्टीवर विश्वास ठेवा. तुमचा परिवार सुरक्षित आहे.म्हणुन तर साधु परिवार सुरक्षित आहे.
४) सेफ डिपॉझीट- ज्यांनी तुमच्यावर उपकार केले,त्यांची आठवण कायम ठेवा. सर्वांच्या उपकाराचे तुम्ही डिपॉसिट केले आहे का? तुमच्यामुळे माझे भले झाले, हे आवर्जुन सांगा वडिलांनी माझ्यासाठी काय केले? अशी म्हणणारी मुलं आहेत. त्यामुळे दुःख होते.
५) सेफ ड्रायव्हिग- ध्येया पर्यंत पोहचण्याचे काम करा. तुम्हांला जे बनायचे असेल. त्याच्या पुढे गुड शब्द लावा. चांगले पती, पत्नी, सून, सासु बना. रत्नप्रवाह प्रवचनमाला यशस्वी करण्यासाठी वृत्तपत्रात प्रवचनाला प्रसिद्ध करण्यासाठी ज्या पत्रकारांनी जे परिश्रम घेतले. व सहकार्य केले. त्या सर्वांचे गुरुदेवांनी आभार मानले.या प्रसंगी मिडटाऊन हॉल मध्ये अमळनेर शहरातील स्त्री- पुरुष भाविक प्रचंड संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!