अजितदादांना बाजूला करण्याचे प्रयत्न ! -शिखर बँक घोटाळाप्रकरणी क्लोजर रिपोर्टला अण्णा हजारेंकडून न्यायालयात आव्हान


24 प्राईम न्यूज 15 Jun2024. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी नेत्यांमधील अंतर्गत संघर्ष वाढीस लागलेला असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महायुतीतून बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात सध्या घडणाऱ्या वेगवान राजकीय घडामोडी पाहता विरोधकांनी याबाबत तसे स्पष्टपणे आरोपही करण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आरएसएसच्या मुखपत्रातून महाराष्ट्रातील भाजपच्या पराभवाचे खापर अजितदादांसोबतच्या युतीवर फोडणे, राज्यसभा निवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांचा अर्ज भरताना महायुतीतील मित्रपक्ष नेत्यांचे पाठ फिरवणे आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंनी शिखर बँक घोटाळ्यातील क्लोजर रिपोर्टला न्यायालयात आव्हान दिल्याने उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अडचणीत वाढ झाली आहे.