रशियातील नदीत वाहून मृत झालेल्या जिशान आणि जियाचा शेकडो लोकांच्या उपस्थितीत झाल दफनविधी.


अमळनेर/प्रतिनिधी. रशियात एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या दोघांचा पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याची घटना 4 जून रोजी घडली होती. त्या नंतर त्यांचे शव काल शुक्रवारी सकाळी 9 वाजता इस्लामपुरा येथे आणले गेले. काही मिनिटात दोघांचे चेहरे पाहून 9:45 वाजता जनाजे उचलून घेतले गेले, या वेळी शेकडो लोग उपस्थित होते,गांधलीपुरा भागाचे कब्रिस्तान येथे दोघांचे दफन विधी 11 वाजता करण्यात आला. कब्रिस्थानला मंत्री अनिल पाटील, ऍड ललिता पाटील, जळगावचे करीम सालार उपस्थित होते. जिशान व जिया यांचा रशियात नदीला पूर येऊन वाहुन गेल्याने दि.4 जून रोजी मृत्यू झाला होता. मोठया शोधमोहीम नंतर त्यांचे मृतदेह प्रशासनाला सापडले. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यावर सुमारे १० दिवसानंतर त्यांचे मृतदेह भारतात आणले गेले, गुरुवारी रात्री मुंबई येथे पोहाचले होते. मुंबई विमानतळावर पूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन रात्री 11 वाजता मुंबईहून निघाले होते.