लोकमान्य विद्यालयात नवागतांचे स्वागत पहिल्याच दिवशी पुस्तके वाटप.

अमळनेर/प्रतिनिधी

अमळनेर लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित लोकमान्य विद्यालयात आज शाळेचा पहिला दिवस म्हणून विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व पेन देऊन स्वागत करण्यात आले. तसेच मोफत पाठ्यपुस्तक योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले. यावेळी शाळेचे प्रभा मुख्याध्यापक मनोहर महाजन, जेष्ठ शिक्षक जितेंद्र चौधरी, जेष्ठ शिक्षिका मनिषा खांजोडकर, सायली देशपांडे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेत्तर वृंद उपस्थित होते. यावेळी मनोहर महाजन यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत व मार्गदर्शन केले.