अमळनेर येथील हसनैन करीमैन वेल्फेअर संस्था तर्फे ५ ऑक्टोंबर रोजी होणार ऑल मुस्लिम समाजाचे सामूहिक विवाह.

अमळनेर/प्रतिनिधी
अमळनेर येथील सामाजिक सेवाभावी संस्था हसनैन करीमैन वेल्फेअर संस्थाच्या माध्यमातून दरवर्षी ऑल मुस्लिम समाजाचे सामुहिक विवाह आयोजित करण्यात येतो यंदा हा सामुहिक विवाह ५ ऑक्टोंबर २०२४ शनिवार रोजी शहरातील जापान जीन ईज्तेमा नगर येथील पटांगणात संपन्न होईल
हसनैन करीमैन वेल्फेअर संस्था अमळनेर जिल्हा जळगांव या सेवाभावी संस्था तर्फे सामुहिक विवाहाच्या उपक्रम राबविण्याचे हे पाचवे वर्ष आहे यावर्षी १५ जोडप्यांचे ऑल मुस्लिम समाजाचे सामुहिक विवाह चे आयोजन करण्यात आले आहे ज्या मुलींचे वय १८ वर्ष पुर्ण व मुलाचे वय २१ वर्ष पुर्ण असलेल्या परिसरातील मुस्लिम बांधवांनी आपल्या मुला मुलींचे लग्न करावयाचे असेल तर त्यांनी अमळनेर येथे संस्थाच्या पदाधिकाऱ्यांशी या भ्रमणध्वनी क्रमांकावर *९०४९९४९९४१ /* *७०२०४५७८४८ *९४२२४०९७५१ ७८७५७८४४०७* संपर्क साधावा तसेच संस्थेच्या वतीने लाकडी पलंग,कपाट,सह संसारासाठी लागणारे महत्वाची साहित्य देण्यात येतो या सामुदायिक विवाहासाठी हसनैन करीमैन संस्थाचे पदाधिकारी व शहरातील काही मुस्लिम बांधव आर्थिक मदत करतात कार्यक्रमाला यशस्वीतेसाठी संस्थाचे अध्यक्ष, हाजी शब्बीर अली पहेलवान, उपाध्यक्ष मोना शेख,जाकिर शेख शकुर,सचिव सैय्यद अजहर अली, सहसचिव अशफाक शेख,खाजिनदार आरीफ मेमन, सदस्य सैय्यद नबी, जुबेर पठाण,मट्या खाटीक,इम्रान शेख परिश्रम घेतात