धार्मिक स्थळाची विटंबना तोडफोड.आरोपी पोलिसांच्या ताब्यात,गावात शांतता.

0

अमळनेर/प्रतिनिधी. अमळनेर शहरातील रुबजी नगर भागात असलेल्या धार्मिक स्थळावर २३ रोजी सकाळी साडे सात वाजता अफरोज शेख (अगरबती लोबान ) पूजा विधी करायला गेले असता तेथील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आणि फरशी तोडलेली दिसली. हळूहळू समाजाचे लोक जमा झाल्यावर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. घटनेचे वृत्त कळताच डीवायएसपी सुनील नंदवाळकर, पोलीस निरीक्षक विकास देवरे, एरंडोल पोलीस निरीक्षक सतीश गोराळे, मारवड सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक, हे कॉ किशोर पाटील, सिद्धांत शिसोदे, मिलिंद बोरसे, अमोल पाटील, जितेंद्र निकुंभे, प्रमोद पाटील, हेकॉ संजय पाटील, चालक सुनील पाटील, मंगल भोई, राहुल पाटील, प्रशांत पाटील, सुनील जाधव, संतोष पवार, योगेश सोनवणे, पुरुषोत्तम वालडे यांचे पथक पोहचले. त्यांनी जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत अफरोज शेख यांना आरोपी महेंद्र भोई उर्फ डोकोमो (रा बहादरपूर रोड म्हाडा कॉलनी) हा असल्याचे समजले. डोकोमो रात्रभर त्याठिकाणी थांबून होता अशी माहिती त्यांना मिळाली. धार्मिक तेढ निर्माण होऊ नये म्हणून कसाली मोहल्ला, झामी चौक व घटनास्थळी तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. अफरोज याच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला महेंद्र उर्फ डोकोमो विस गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिसांना आरोपी महेंद्र भोई बहादरवाडीला रेशनची गाडी खाली करत असल्याची माहिती मिळाली आरोपीला पकडण्यासाठी सिद्धांत शिसोदे, अमोल पाटील, जितेंद्र निकुंभे, मंगल भोई, संजय सोनवणे, गणेश पाटील तेथे पोहचले. आरोपीला पोलिसांची चाहूल लागताच तो बोरी नदीत पळाला. पोलिसांनी देखील त्याचा पाठलाग सुरू केला. बोरी नदीच्या पलीकडे हिंगोणे गावाजवळ सीताराम महाराज मंदिराजवळ महेंद्रवर झडप घालून त्याला अटक करण्यात आली. आरोपीला लागलीच अटक केल्याने जमाव शांत झाला. शहरात संवेदनशील भागात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून पोलिसांनी व दोन्ही समाजाने शांततेचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!