मुस्लिमांना ओबीसीतून आरक्षण देण्याची जरांगेंची मागणी..

24 प्राईम न्यूज 24 Jun 2024.
मुस्लिम समाजाच्या नोंदी जर कुणबी म्हणून निघत असतील तर राज्यातील सर्व मुस्लिमांना इतर मागास वर्गात न (ओबीसी) आरक्षण द्यावे, अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीवर प्रतिक्रिया देताना ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे की, हिंदू धर्माची सामाजिक उतरंडीमध्ये विभागणीझाली आहे, पण मुस्लिम समाजाकडे धर्म म्हणून पाहिले जाते. त्यांच्यात जाती नसल्याने कारू आणि नारू असे दोन गट पडतात. त्यापैकी कारू हा व्यवसाय करणारा घटक आहे. त्यामुळे घटनेनुसार त्यांना स्थानिक अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र दिले जाते.
सरकारी नोंदी या मारवाडी, ब्राह्मण, लिंगायत आणि मुस्लिमांच्याही आहेत, जर त्यांच्या नोंदी शेतकरीकुणबी म्हणून निघाल्या असतील तर मुस्लिमांनाही ओबीसीतून आरक्षण दिले पाहिजे, त्यांच्यावर अन्याय होऊ नये, असे जरांगे म्हणाले.