मतदार यादीत नाव आहे का खात्री करा ; प्रारूप यादी 25 जुलै रोजी प्रसिद्ध होणार.

0

24 प्राईम न्यूज 28 Jun 2024. आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 विचारात घेऊन 1 जुलै, 2024 या अर्हता दिनांकावर (Qualifying Date ) आधारित मतदार यादीचा दुसरा विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. सदर कार्यक्रमांतर्गत 25 जून,2024 ते 24 जुलै, 2024 पर्यंत पुर्नरीक्षण कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने निर्धारीत केला आहे. तसेच पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत 25 जुलै, 2024 रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करावयाची असून 20 ऑगसट, 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करावयाची आहे.
पुनरिक्षण उपक्रम – मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडून घरोघरी पडताळणी , मतदान केंद्रांचे तर्कशुध्दीकरण / पुनर्रचना, मतदार यादी EPICS मधील तफावत दूर करणे, अस्पष्ट, निकृष्ट दर्जाची छायाचित्रे बदलून चांगल्या प्रतीची छायाचित्रे सुनिश्चित करुन प्रतिमा गुणवत्तेत सुधारणा करणे आणि रोलमध्ये विनिर्देशन आणि गैर – मानवी प्रतिमा बदलणे, विभाग / भागांची पुनर्रचना करणे आणि मतदान केंद्राच्या विभाग / भाग सीमांच्या प्रस्तावित पुनर्रचनेचे अंतिम रुप देणे आणि मतदान केंद्राच्या यादीला मंजुरी मिळवणे, कंट्रोल टेबल अद्ययावत करणे, नमुना 1 ते 8 तयार करणे, 01 जानेवारी, 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत एकत्रितकृत प्रारुप यादी तयार करणे – कालावधी – 25 जून 2024 (मंगळवार) ते 24 जुलै, 2024 (बुधवार)
पुनरिक्षण उपक्रम –
एकत्रित प्रारुप मतदार यादी प्रसिध्दी करणे – 25 जुलै, 2024 (गुरुवार)
दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी – 25 जुलै, 2024 (गुरुवार ) ते 9 ऑगस्ट, 2024 (शुक्रवार)
विशेष मोहिमांचा कालावधी – दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीत, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांनी निश्चित केलेले शनिवार आणि रविवार
दावे व हरकती निकालात काढणे, अंतिम प्रसिध्दीसाठी आयोगाची परवानगी मागणे, डेटाबेसचे अद्यावतीकरणे आणि पुरवणी याद्यांची छपाई करणे – 19 ऑगस्ट,2024 (सोमवार) पर्यंत
अंतिम मतदार यादी प्रसिध्दी करणे – 20 ऑगस्ट, 2024 (मंगळवार)
असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरविंद अतुर्लीकर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!